Karjmafi Logo
Beed Karj Mafi Yojana List

Karj Mafi Yojana List Beed | बीड जिल्हा शेतकरी कर्जमाफी यादी 2026

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात २२ जुलै रोजी पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर झाली. त्यात बीडचा समावेश नव्हता. महाराष्ट्र राज्यात सध्या कर्जमाफी संदर्भात नवनवीन यादी प्रकाशित केले जात आहे.

बीड जिल्ह्यात बँकांकडून पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर याद्या उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांनी आता आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागेल. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या लाभ मिळेल.

महत्त्वाची माहिती

  • बीड जिल्ह्याचा पहिल्या राज्य यादीत समावेश नाही परंतु पुढील याद्यांमध्ये बीड चा समावेश होण्याची शक्यता
  • स्थानिक कार्यालयात यादी तपासता येणार
  • रक्कम थेट कर्ज खात्यात जमा होईल
  • टप्प्याटप्प्याने पूर्ण याद्या येणार
  • स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही

महाराष्ट्र राज्य शेतकरी कर्जमाफी योजनेची मूलभूत माहिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी ही योजना आणण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. २ जून २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला.

बाबमाहिती
योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
कर्ज कालावधी१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५
थकबाकी तारीख३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत
राज्यमहाराष्ट्र
यादी बघण्याची पद्धतीऑफलाइन तसेच ऑनलाईन पोर्टल
अर्ज पद्धतस्वतंत्र अर्ज नाही, बँक यादीनुसार

बीड जिल्हा शेतकरी कर्जमाफी यादी कशी तपासावी

जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर यादी मध्ये नाव आल्यावर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस येईल त्यामुळे मोबाईलवर एसएमएस येण्याची वाट पहा. तसेच ऑफलाइन माध्यमातून देखील तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकाल.

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन यादी पाहता येते. तलाठी कार्यालयातही चौकशी करता येते. बँक शाखेत कर्ज खाते क्रमांक सांगून स्थिती विचारता येते. आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनही माहिती मिळते.

ऑनलाइन पूर्ण नामनिहाय यादी अद्याप सार्वजनिक वेबसाइटवर उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर तपासणेच योग्य आहे.

बीड जिल्हा कर्जमाफी यादीत नाव आल्यानंतर पुढची पावले

कर्जमाफी यादीमध्ये नाव दिसले की लगेच जवळच्या आपले सरकार केंद्रात जा. आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर सोबत ठेवा. प्रमाणीकरण झाल्यावर डीबीटीद्वारे कर्ज खात्यात रक्कम जमा होते.

AgriStack नोंदणी नसल्यास तेही पूर्ण करा. कागदपत्रे अपूर्ण असल्यास तलाठी किंवा बँक शाखेत मदत घ्या. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवीन पीक कर्ज घेता येईल.

जर तुमचे नाव यादीमध्ये नसेल तर टेन्शन घेऊ नका राज्य शासनाकडून नवनवीन यादी प्रसारित केले जात आहे पुढील यादीमध्ये तुमचे नाव असू शकते जर काही तक्रार असेल तर योग्य विभागाकडे तक्रार नोंदवा.

बीड शेतकऱ्यांसाठी पुढील प्रक्रिया

पहिली यादी फक्त काही जिल्ह्यांसाठी होती. बीडसह इतर जिल्ह्यांच्या याद्या पुढील टप्प्यात येणार आहेत. राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकांच्या याद्याही क्रमाने प्रसिद्ध होतील.

शेतकऱ्यांनी आपली माहिती बँकेत अद्ययावत ठेवावी. KYC प्रक्रिया पूर्ण असावी. यामुळे रक्कम जमा होण्यास विलंब होणार नाही. सरकारने पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र. बीड जिल्ह्यातील यादी कुठे दिसेल?
उ. ग्रामपंचायत, बँक शाखा आणि आपले सरकार केंद्रात उपलब्ध आहे. ऑनलाइन पूर्ण नामनिहाय यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

प्र. पहिल्या यादीत नाव नसेल तर?
उ. पुढील याद्या येण्याची वाट पहा. बँकेत किंवा सहकार कार्यालयात चौकशी करा.

प्र. बीड जिल्ह्यात एकूण किती शेतकऱ्यांना लाभ मिळेल?
उ. याबाबत अद्याप अधिकृत अंतिम आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. याद्या टप्प्याटप्प्याने येत आहेत.

स्रोत

  • कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर! ५३३ पात्र शेतकऱ्यांना मिळाला लाभ – लोकमत
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शासन निर्णय – महाराष्ट्र शासन
  • Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु – ॲग्रोवन