Karjmafi Logo
Karj Mafi Yojana List Bhandara

भंडारा जिल्हा शेतकरी कर्जमाफी यादी 2026 संपूर्ण अपडेट | Karj Mafi Yojana List Bhandara

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे २३ हजार ६५८ कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे.

राज्यात २२ जुलै २०२६ रोजी पहिली प्रातिनिधिक यादी आली. त्यात भंडाराचा समावेश नव्हता. तरीही स्थानिक पातळीवर याद्या उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांनी आता आपले नाव तपासून प्रक्रिया पूर्ण करावी.

महत्त्वाची माहिती

  • भंडारा जिल्ह्यात २३ हजार ६५८ कर्ज खाती अपलोड
  • पहिल्या राज्य यादीत जिल्ह्याचा समावेश नाही
  • स्थानिक कार्यालयात यादी तपासता येते

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध आर्थिक संकटांमुळे कर्ज भरता आले नाही अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यामध्ये कर्जमाफी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

बाबमाहिती
योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
एकूण लाभार्थीअंदाजित 56 लाखापेक्षा जास्त
थकबाकी तारीख३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत
माफी मर्यादादोन लाख रुपये (मुद्दल + व्याज)
प्रोत्साहन अनुदानजास्तीत जास्त ५० हजार रुपये
यादी बघण्याची प्रक्रियाऑनलाइन तसेच ऑफलाईन

भंडारा जिल्ह्यात यादी कशी तपासावी

जर तुम्ही भंडारा जिल्ह्यातील नागरिक असाल आणि तुम्ही कर्जमाफी योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी यादीमध्ये नाव येण्याची प्रतीक्षा बघत असाल तर यादीमध्ये नाव आल्यानंतर तुमच्या मोबाईल वर SMS येईल. मोबाईलवर एसएमएस येण्याची वाट पहा. पात्र असल्यास आधार kyc प्रमाणीकरणाची लिंक येते. लिंकवर क्लिक करून प्रमाणीकरण काम पूर्ण करा. किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन प्रमाणीकरण पूर्ण करा.

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन यादी पाहता येते. तलाठी कार्यालयातही चौकशी करता येते. बँक शाखेत कर्ज खाते क्रमांक सांगून स्थिती विचारता येते. आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनही माहिती मिळते.

ऑनलाइन पूर्ण नामनिहाय यादी अद्याप सार्वजनिक वेबसाइटवर उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर तपासणेच योग्य आहे. जेव्हा राज्य शासनाकडून ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येईल त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादीमध्ये आपले नाव चेक करू शकाल.

भंडारा जिल्हा कर्जमाफी यादी मध्ये नाव आल्यानंतर काय करावे

भंडारा जिल्हा कर्जमाफी यादी मध्ये नाव दिसले की लगेच जवळच्या आपले सरकार केंद्रात जा. आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर सोबत ठेवा. तिथे जाऊन प्रमाणीकरण झाल्यावर डीबीटीद्वारे कर्ज खात्यात रक्कम जमा होते.

जर तुमचे AgriStack नोंदणी नसल्यास तेही पूर्ण करा. कागदपत्रे अपूर्ण असल्यास तलाठी किंवा बँक शाखेत मदत घ्या. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवीन पीक कर्ज घेता येईल.

नाव नसल्यास घाबरू नका. याद्या टप्प्याटप्प्याने येत आहेत. बँकेत किंवा सहकार कार्यालयात चौकशी करा.

भंडारा शेतकऱ्यांसाठी पुढील प्रक्रिया

पहिली यादी फक्त काही जिल्ह्यांसाठी होती. भंडारासह इतर जिल्ह्यांच्या याद्या पुढील टप्प्यात येणार आहेत. राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकांच्या याद्याही क्रमाने प्रसिद्ध होतील.

शेतकऱ्यांनी आपली माहिती बँकेत अद्ययावत ठेवावी. KYC प्रक्रिया पूर्ण असावी. यामुळे रक्कम जमा होण्यास विलंब होणार नाही. सरकारने पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवली आहे.

लक्षात ठेवा की कर्जमाफी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे यादीत नाव येण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका. अद्याप पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही त्यामुळे फेक वेबसाईट पासून स्वतःचा बचाव करा.