पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मध्ये पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजे KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. कर्जमाफी यादीत नाव आल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय रक्कम खात्यात जमा होत नाही.
राज्यात याद्या टप्प्याटप्प्याने येत आहेत. काही शेतकऱ्यांना एसएमएस आला आहे किंवा येणार आहे. अलीकडे ऑनलाईन KYC पोर्टल सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे KYC कसे करावे हे नीट समजून घेणे गरजेचे आहे.
महत्त्वाची माहिती
- यादीत नाव आल्यानंतर आधार प्रमाणीकरण अनिवार्य
- ऑनलाईन पोर्टल आणि आपले सरकार केंद्रातून प्रक्रिया शक्य
- AgriStack नोंदणीही आवश्यक असू शकते
- प्रमाणीकरणानंतर डीबीटीद्वारे रक्कम जमा
- स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही
- KYC अपूर्ण असल्यास लाभ मिळणार नाही
- काही सूचनांनुसार बायोमेट्रिक पद्धतीला प्राधान्य
महाराष्ट्र कर्जमाफी योजनेची मूलभूत रचना काय आहे
महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी ती लागू होते.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेले कर्ज पात्र आहे. दोन लाख रुपयांपर्यंत मुद्दल व व्याज या शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत माफ होते.
| बाब | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ |
| कर्ज कालावधी | १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ |
| थकबाकी तारीख | ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत |
| माफी मर्यादा | दोन लाख रुपये (मुद्दल + व्याज) |
| प्रोत्साहन अनुदान | जास्तीत जास्त ५० हजार रुपये |
| अर्ज पद्धत | स्वतंत्र अर्ज नाही, बँक यादीनुसार |
एक किंवा अनेक बँक खाती असली तरी एकूण थकबाकी दोन लाखांपर्यंत माफ होते. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असल्यास उर्वरित रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत भरावी लागेल.
कर्जमाफी मध्ये KYC प्रक्रिया का गरजेची आहे
सरकारने पारदर्शकता राखण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. यामुळे योग्य लाभार्थ्यालाच रक्कम मिळते. दुसऱ्याच्या नावाने लाभ मिळण्याची शक्यता कमी होते. लाडकी बहिणी योजनेमध्ये अनेक अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला होता हे टाळण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
KYC पूर्ण झाल्याशिवाय डीबीटी सुरू होत नाही. त्यामुळे यादीत नाव असूनही प्रक्रिया पूर्ण न केल्यास रक्कम अडकून राहते. AgriStack नोंदणीही काही प्रकरणांत आवश्यक आहे. अलीकडील अपडेटनुसार काही ठिकाणी फक्त बायोमेट्रिक पद्धतीने KYC करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
KYC कसे पूर्ण करावे – स्टेप बाय स्टेप (अपडेटेड)
पद्धत १: ऑनलाईन पोर्टलद्वारे (नवीन पर्याय)
१. पात्र शेतकऱ्यांना एसएमएस किंवा अधिकृत सूचनेद्वारे पोर्टल लिंक मिळते.
२. लिंकवर क्लिक करून किंवा संबंधित अधिकृत पोर्टल (जसे की FLRS संबंधित किंवा आपले सरकार लिंक) उघडा.
३. आधार क्रमांक टाका.
४. मोबाईलवर आलेला OTP टाका.
५. बायोमेट्रिक (बोट ठसा) किंवा इतर प्रमाणीकरण पर्याय पूर्ण करा.
६. प्रक्रिया यशस्वी झाल्याची पुष्टी स्क्रीनवर दिसेल.
७. स्क्रीनशॉट काढून ठेवा.
पद्धत २: मोबाईल एसएमएस लिंकद्वारे
१. पात्र शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सरकारकडून एसएमएस येतो.
२. एसएमएसमधील लिंकवर क्लिक करा.
३. उघडलेल्या पेजवर आपला आधार क्रमांक टाका.
४. मोबाईलवर आलेला OTP टाका.
५. काही ठिकाणी बायोमेट्रिक पर्याय येतो. तो पूर्ण करा.
६. प्रक्रिया यशस्वी झाल्याची पुष्टी स्क्रीनवर दिसेल.
७. स्क्रीनशॉट काढून ठेवा.
पद्धत ३: आपले सरकार सेवा केंद्रातून
१. जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जा.
२. आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर सोबत ठेवा.
३. कर्मचारी आपला आधार क्रमांक आणि कर्ज खाते तपशील घेतील.
४. OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे प्रमाणीकरण पूर्ण होतील.
५. AgriStack नोंदणी नसल्यास तेही तिथेच करून घ्या.
६. प्रक्रिया पूर्ण झाल्याची पावती किंवा पुष्टी घ्या.
पद्धत ४: बँक शाखा किंवा ग्रामपंचायत
काही ठिकाणी बँक शाखा किंवा ग्रामपंचायत कार्यालयातही मदत मिळते. तिथे जाऊन आपली माहिती द्या. कर्मचारी पोर्टलवर प्रक्रिया पूर्ण करून देतील.
महत्त्वाच्या सूचना
- फक्त अधिकृत लिंक वापरा. फसव्या लिंकवर क्लिक करू नका.
- आधार लिंक्ड मोबाईल नंबर चुकीचा असेल तर आधी तो अपडेट करा.
- कर्जमाफी प्रक्रिया मोफत आहे. कोणालाही पैसे देऊ नका.
- एकदा प्रक्रिया यशस्वी झाली की पुन्हा करण्याची गरज नाही.
- अलीकडील सूचनांनुसार बायोमेट्रिक पद्धतीला प्राधान्य दिले जाऊ शकते.
- शक्यतो आपले सरकार सेवा केंद्र मधूनच आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण पार पाडा
कर्जमाफी योजना साठी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत
आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे आहे. बँक पासबुक किंवा कर्ज खाते स्टेटमेंट लागते. नोंदणीकृत मोबाईल नंबर हवा. ७/१२ उतारा किंवा शेतकरी आयडी अतिरिक्त पुरावा म्हणून उपयोगी आहे.
सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवा. KYC प्रक्रिया पूर्ण असावी. केंद्रांवर गर्दी असू शकते त्यामुळे सकाळी जाणे चांगले आहे. तसेच जर बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असेल तर तो लिंक करून घ्या.
KYC पूर्ण न झाल्यास काय होते
KYC प्रमाणीकरण अपूर्ण असल्यास रक्कम जमा होत नाही. यादीत नाव असूनही लाभ मिळत नाही. त्यामुळे विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करा.
जर आधार लिंक्ड मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तो बँकेत किंवा आधार केंद्रात अपडेट करा. AgriStack नोंदणी नसल्यास तेही पूर्ण करा.
कर्जमाफी प्रक्रियेत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी
एसएमएस किंवा पोर्टल लिंक आली की लगेच प्रक्रिया पूर्ण करा. लिंकवर क्लिक करताना फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या. फक्त अधिकृत लिंक वापरा. किंवा सर्वात सोपे आपले सरकार सेवा केंद्र मधून प्रक्रिया पार पाडा.
मध्यस्थांना पैसे देऊ नका. संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. समस्या असल्यास जिल्हा सहकार कार्यालय किंवा आपले सरकार हेल्पलाइनवर संपर्क साधा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र. ऑनलाईन KYC कसे करावे?
उ. एसएमएस किंवा अधिकृत पोर्टल लिंकवरून आधार क्रमांक, OTP आणि बायोमेट्रिकद्वारे प्रक्रिया पूर्ण करा.
प्र. KYC कुठे करावे?
उ. ऑनलाईन पोर्टल, एसएमएस लिंक, आपले सरकार सेवा केंद्र, बँक शाखा किंवा ग्रामपंचायत येथे.
प्र. कर्जमाफी एसएमएस आला नाही तर काय करावे?
उ. ग्रामपंचायत, बँक शाखा किंवा आपले सरकार केंद्रात चौकशी करा. ऑनलाईन पर्याय उपलब्ध असल्यास तो वापरा.
प्र. KYC पूर्ण झाल्यानंतर रक्कम कधी येईल?
उ. KYC प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर डीबीटीद्वारे काही दिवसांत कर्ज खात्यात जमा होते.
प्र. AgriStack नोंदणी गरजेची आहे का?
उ. आपल्याकडे आपला फार्मर आयडी क्रमांक असणे गरजेचे आहे.
प्र. KYC अपूर्ण असल्यास लाभ मिळेल का?
उ. नाही. KYC प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय रक्कम जमा होत नाही.
स्रोत
- अशी करा ऑनलाईन कर्जमाफीची केवायसी | Shetkari Karjmafi KYC online – Prabhudeva GR & sheti yojana
- कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर! ५३३ पात्र शेतकऱ्यांना मिळाला लाभ – लोकमत
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शासन निर्णय – महाराष्ट्र शासन
- Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु – ॲग्रोवन




