Karjmafi Logo
Karjmafi Yadi

Karjmafi Yadi 2026 PDF Maharashtra, District wise list | शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संपूर्ण यादी महाराष्ट्र राज्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफी ची पहिली यादी 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत प्रसारित करण्यात आलेली आहे परंतु या यादीमध्ये फक्त 553 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत पहिल्या टप्यात 16.95 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपदांना तसेच संकटांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे शेतीच्या कर्जाची परतफेड करणे अवघड होते त्यात थकबाकी वाढत गेल्याने शेतकऱ्याच्या संकटांमध्ये वाढ होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनामार्फत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती आणि त्याचीच अंमलबजावणी म्हणून यादी प्रसारित करण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या कर्जमाफी यादीत 553 शेतकऱ्यांचा समावेश
  2. शासनाकडून 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचा निधी पहिल्या यादीतील शेतकऱ्यांसाठी मंजूर
  3. टप्प्याटप्प्याने राज्य शासनामार्फत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण पार पाडणार
  4. जवळपास 16.95 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रकाशित

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 फॉर्म PDF महाराष्ट्र

योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
पहिली यादी22 जुलै 2026
आतापर्यंत लाभार्थी संख्या16.95 लाख
एकूण लाभ2 कोटी 99 लाख 37 हजार 540
यादीचे स्वरूपPDF तसेच ऑफलाईन
योजनेची पात्रतामहाराष्ट्र राज्य कर्जदार शेतकरी
List website[माहिती वेबसाईट]

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ भेटणार आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी विविध निकष आखण्यात आले होते ज्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

2026 च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 चा लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचे निर्धारित करण्यात आले होते परंतु त्यामध्ये बदल करून आता संबंधित शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. नवीन निकषामुळे जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

Karjmafi Yojana Yadi 2026 PDF Maharashtra, District Wise List Check

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यादीमध्ये नाव समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्गीत करण्यात येईल.

शेतकरी कर्जमाफी मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती एसएमएसच्या माध्यमातून यादी प्रकाशित झाल्यानंतर सूचित करण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांची कर्ज असणाऱ्या बँक अकाऊंट ची kyc असणे गरजेचे आहे.

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 मध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्र मार्फत प्रसारित केले जातील. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावरती स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येईल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

District wise Shetkari Karjmafi List Maharashtra 2026

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावरती स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या कर्जमाफी योजनेच्या याद्या प्रकाशित करण्यात येणार आहे. सध्या राज्य शासनाकडून फक्त शेतकऱ्यांची प्राथमिक यादी प्रसारित करण्यात आलेली आहे त्यामुळे उर्वरित शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्हास्तरावरील यादी चेक करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन माध्यमांची मदत घेता येऊ शकते ऑनलाईन माध्यमांमध्ये अधिकारीक पोर्टल वरती जाऊन आपल्या फार्मर आयडी च्या मदतीने आपण शेतकरी कर्जमाफी लिस्ट चेक करू शकाल.

जिल्हानिहाय पात्र शेतकरी यादी | District wise Eligible Farmers

खालील तक्ता स्रोतातील माहितीनुसार तयार केला आहे. ही संख्या प्रसिद्ध झालेल्या याद्यांवर आधारित आहे आणि टप्प्याटप्प्याने अपडेट होत आहे.

जिल्हापात्र शेतकरी संख्या
अहिल्यानगर१,१६,५१२
जालना१,००,०७५
छत्रपती संभाजीनगर९९,६४८
बीड९७,२९२
नांदेड९६,९२०
परभणी (पहिली यादी)७९,८५५
अमरावती७१,६५५
नाशिक६८,८५९
पुणे६१,९००
लातूर५४,४२६
सातारा५३,७३६
अकोला५३,८९६
जळगाव५३,८९६
वाशिम५२,८८१
यवतमाळ५१,७३८
धाराशिव४६,०४६
हिंगोली४४,१७७
नागपूर३८,१२५
सांगली३७,८६५
चंद्रपूर३६,७५७
कोल्हापूर (अपलोड)२९,४०९
बुलढाणा१०,४६७
सिंधुदुर्ग६,७११
रत्नागिरी५,२७८
धुळे३,५१७
नंदुरबार३,४४४
गडचिरोली२,५३९
वर्धा६०,०००

एकूण (उपलब्ध जिल्हे): सुमारे १७.५६ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत (स्रोतानुसार १७ लाख ४८ हजार ७९६).

महत्त्वाची सूचना:
या संख्या टप्प्याटप्प्याने येत आहेत. पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

महाराष्ट्र राज्य शेतकरी कर्जमाफी योजना जिल्हानुसार यादी

DistrictDistrictDistrict
अहिल्यानगरअकोलाअमरावती
बीडभंडाराबुलढाणा
चंद्रपूरछत्रपती संभाजीनगरधाराशिव
धुळेगडचिरोलीगोंदिया
हिंगोलीजळगावजालना
कोल्हापूरलातूरमुंबई शहर
मुंबई उपनगरनागपूरनांदेड
नंदुरबारनाशिकपालघर
परभणीपुणेरायगड
रत्नागिरीसांगलीसातारा
सिंधुदुर्गसोलापूरठाणे
वर्धावाशीमयवतमाळ