योजना माहिती - द्रुत निर्देशांक (Quick Index)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
महाराष्ट्र राज्य मधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू करण्यात आलेली आहे. यासाठीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि पात्र शेतकऱ्यांना यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान होते. अनियमित पाऊस, दुष्काळ, गारपीट तसेच अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी कर्ज असल्यामुळे परत कर्ज घेऊ शकत नाहीत त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते.
शेतकऱ्यांवरचा कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी वेळोवेळी विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि 2022 मध्ये प्रोत्साहन पर लाभ देण्यात आला होता.
✳️ महत्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
- 30 ऑक्टोबर 2025 रोजी कर्जमाफी लाभासाठी समिती गठित करण्यात आली
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना योजनेची घोषणा केली
- महाराष्ट्र राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळेल
| योजना | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना |
|---|---|
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्य शेतकरी |
| लाभ | दोन लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन पर अनुदान |
| राज्य | महाराष्ट्र |
| अर्ज पद्धत | बँक यादी मार्फत |
| पात्रता | महाराष्ट्र राज्य कर्जदार शेतकरी |
| वेबसाईट | karjmafi.pikmahiti.com |
| Karjmafi 1st List 553 farmer | July 22, 2026 |
| Karjmafi 2nd List 61,900 Farmer | July 24, 2026 |
| Karjmafi 3rd list 16.95 Lakh Farmer | July 24, 2026 (late night) |
महाराष्ट्र राज्य शासनाकडून दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी बँकांकडून यादी मागवण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे दस्तावेज अपुरे असतील त्यांना संबंधित दस्तावेज बँकेच्या शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Maharashtra Shetkari Karjmafi 2026 | योजनेचे लाभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याकरिता राज्य शासनाकडून महत्त्वाचे तीन निकष ठेवण्यात आलेले आहेत: कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंट तसेच प्रोत्साहन पर अनुदान.
महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्याकरता तुम्हाला काही पात्रता निकष पार पाडणे गरजेचे आहे. निकष पूर्ण असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
💰 दोन लाखांपर्यंत कर्जमाफी
पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी. जमीन धारणा न पाहता लाभ मिळणार.
🤝 वन टाइम सेटलमेंट
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची सोय.
🏅 प्रोत्साहन अनुदान
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ₹50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान. नियमित शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही.
🌾 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण व सहकारी बँकांचे कर्जदार पात्र असतील.
Maharashtra Shetkari Karjmafi Yojana Eligibility | पात्रता अटी आणि शर्ती
- ज्या शेतकऱ्यांनी 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत अल्पमुदत पीककर्ज किंवा पीककर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत पीक कर्ज घेतलेले असेल आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल, तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेली नसेल आणि सर्व बँक खात्यांवरील एकूण पीककर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत असेल, तर अशा शेतकऱ्यांना संपूर्ण दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. (कर्जाची एकूण रक्कम म्हणजे मुद्दल तसेच व्याज पकडून दोन लाखांपर्यंत). यासाठी जमीन धारणा लक्षात न घेता लाभ मिळणार.
- ज्या शेतकऱ्यांना 2019 च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळालेला असेल आणि संबंधित शेतकऱ्यांचे अल्पमुदत तसेच पीककर्जाच्या पुनर्गठनाची एकूण रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत असेल, तर अशा शेतकऱ्यांना अधिकतम पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल.
Maharashtra Shetkari Karjmafi Yojana One Time Settlement | एक वेळ समझोता निकष
ज्या शेतकऱ्यांचे एकत्रित कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने एक वेळ समझोता निकष निर्धारित केलेले आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत अल्पमुदत तसेच पुनर्गठन/फेरपुनर्गठन मध्यम मुदत पीककर्ज घेतलेले असेल, संबंधित कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेली नसेल, तसेच कर्जाची एकूण रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त असेल, तर अशा शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत दोन लाखांवरील उर्वरित सर्व कर्ज भरावे लागेल.
- जे शेतकरी दोन लाखांवरील कर्ज 31 मार्च 2027 पर्यंत परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.
- ज्या शेतकऱ्यांना 2019 च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत परत कर्ज घेतलेले असेल आणि कर्जाची एकूण रक्कम 2 lakh पेक्षा जास्त असेल, तर संबंधित शेतकऱ्याला 2 लाख वरील सर्व थकबाकी 31 मार्च 2027 पर्यंत परतफेड करावी लागेल आणि त्यानंतर त्यांना 2 lakh रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.
महाराष्ट्र शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन पर अनुदान निकष
महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी नेहमीच कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना लाभ मिळावा तसेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. संबंधित अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये असेल.
- ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24, 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्ष कर्ज घेऊन कर्जाची परतफेड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.
- सन 2023-24 अथवा 2024-25 कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची एकूण रक्कम ₹50,000 पेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांसाठी कमाल ₹50,000 चे प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.
शेतकरी कर्जमाफी 2026 - महत्त्वाचे निकष
- शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण असणे गरजेचे आहे.
- संबंधित शेतकऱ्यांनी Agristack फार्मर पोर्टल वर नोंदणी करणे गरजेचे आहे.
- ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही.
- योजनेमध्ये लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी पात्र असतील.
- राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच प्राथमिक शेतकरी पत पुरवठा सहकारी संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 - अपात्रता निकष
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून खालील व्यक्तींना वगळण्यात येणार आहे:
- महाराष्ट्र राज्यातील विद्यमान तसेच भूतपूर्व मंत्री/राज्यमंत्री, लोकसभा/राज्यसभा/विधानसभा/विधान परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद/नागरी संस्थांचे सदस्य.
- केंद्रशासन तसेच राज्य शासनाचे कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असेल.
- महाराष्ट्र राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (ST महामंडळ, महावितरण इ.) व अनुदानित संस्थांचे कर्मचारी ज्यांचे वेतन ₹25,000 पेक्षा जास्त.
- शेतीबाह्य उत्पादनातून आयकर भरणारी व्यक्ती.
- माजी सैनिक वगळता निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक पेन्शन ₹25,000 पेक्षा जास्त असेल.
- कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी/जिल्हा/राज्य सहकारी बँक, सहकारी दूध संघ यांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व कर्मचारी ज्यांचे वेतन ₹25,000 पेक्षा जास्त. (कंत्राटी कर्मचारी पात्र)
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावे
जर तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असाल तर खालील पायऱ्या फॉलो करा:
आधार प्रमाणीकरण करा
सर्वात प्रथम तुमचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. हे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य आहे.
Agristack पोर्टलवर नोंदणी करा
Agristack फार्मर पोर्टलवर जाऊन जर नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
बँकेत दस्तावेज जमा करा
जर तुमचे कोणतेही दस्तावेज अपूर्ण असतील तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ते दस्तावेज जमा करावे लागतील जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
बँक यादी तपासा
बँकेकडून येणाऱ्या यादीत तुमचे नाव तपासा. पात्र असाल तर बँक तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देईल.
महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना 2026 - अधिकृत शासन निर्णय (GR)
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
📋 शासन निर्णय पाहण्यासाठी:
सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न (FAQ)
कर्जमाफीसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्य शासनामार्फत 2026 मध्ये कर्जमाफी योजना सुरू करण्यात आलेली आहे. 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत पीककर्ज घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले, तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले शेतकरी पात्र आहेत. पात्रता निकष आणि अपात्रता निकषाची सविस्तर माहिती सदर लेखामध्ये देण्यात आली आहे.
कर्जमाफी कधी मिळेल?
महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि त्यानंतर 02 जून 2026 पासून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.
शेतकरी कर्जमाफी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?
शेतकरी कर्जमाफी यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटची मदत घ्यावी लागेल जिथे तुम्हाला आपला Farmer ID किंवा आधार कार्ड क्रमांक टाकून तुमच्या कर्जमाफीतील नावाची तपासणी करता येईल.
महात्मा फुले कर्ज माफी योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य शासनामार्फत 2019 मध्ये कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली होती ज्याला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 असे नाव देण्यात आले. या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2026 च्या योजनेत काही निकषांसह वेगळ्या पद्धतीने लाभ मिळेल.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळेल?
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान उपलब्ध आहे. 2022-23, 2023-24, 2024-25 पैकी दोन वर्ष कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ₹50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळेल.
